माणुसकी आणि औद्योगिक विकासाच्या स्वप्नांची होरपळ
- संजीव
उन्हाळे
औरंगाबादमध्ये
मध्यंतरी घडलेल्या अप्रिय घटनांमुळे औद्योगिक विकासाच्या स्वप्नावर घाला घातला
गेला. गुंतवणुकीचे वातावरण निर्माण होत असतानाच या जाळपोळीच्या घटनांमुळेच शहराचे
भविष्य करपून गेले. केवळ राजकीय मंडळींनी हे शहर चालविण्याचा ठेका घेतलेला नाही.
सुजाण नागरीक एकत्र येत नसल्यामुळे अजाण नेत्यांचा अरदांडपणा वाढत आहे. दंगली
पेटवून पर्यटनाच्या आणि उद्योगाच्या या राजधानीच्या विकासाला खीळ घालणाNया
घटनेचे उत्तरदायित्व कोण घेणार?
अंत:करणात कायम जपावे
असे हे एक ़ऐतिहासिक शहर. कालपरवाच्या दंगलीने पुन्हा एकदा पेटले. अनेक ऐतिहासिक
सभांचा,
उत्सवांचा साक्षीदार म्हणून १२७ वर्षांपासून उभा असलेला
शहागंजचा टॉवर त्या रात्री सुन्न झाला. चमन परिसर उजाड पडला. हाडामासाची माणसे
एकमेकांच्या जिवावार ऊठतात तेव्हा शांतता आणि बंधुभाव होरपळतो. पुन्हा पुन्हा असे
घडू नये म्हणून तर निझामी राजवटीला विरोध करून या मातीतील रयतेने सुखी सहजीवनाचे
भावस्वप्न पाहिले होते. कालची दंडेली बघून याचसाठी केला होता का मराठवाडा मुक्तीचा
अट्टाहास?
शहराची सारी प्रतिमाच डागाळली. नुकसान भरून काढता येते. पण
स्वप्नाला गेलेला तडा लवकर लिंपता येत नाही. अनेक वर्षांपासून जपलेला बंधूभाव आणि
एकात्मता पुन्हा पुन्हा दंगलीमुळे पायदळी तुडविली जाते. द्वेष, मत्सराचे
ठसे पुन्हा गडद होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागणार आहे.
या ऐतिहासिक पर्यटन
राजधानीत आणि आधुनिक उद्यमनगरीत इंटरनेटही यंत्रणा ठप्प पडली. पेâसबुक, व्हॉट्सअप, एसएमएस-
अख्ख्या सोशल मिडियाला जामर लावले गेले. हे चांगले संकेत नव्हेते. उद्योग
क्षेत्रावर होणारे परिणाम लगेच लक्षात येत नाहीत. विप्रोचे सर्वेसर्वा अन् जगातील
दानशूर व्यक्ती असलेले अजीम प्रेमजी परवा डीएमआयसीचे कौतुक ऐवूâन
औरंगाबादला यायला निघाले होते. परवाच्या अनुचित घटनेमुळे त्यांनी औरंगाबाद भेट
रद्द केली. हा समृद्धीला अडविण्याचाच प्रकार म्हणावा लागेल. इथल्या अनधिकृत
नळावरचे भांडण देशभर झाले. त्याला जबाबदार कोण? अगदी
अलीकडे मुख्यमंत्री आणि वेंâद्रीय मंत्री सुरेश
प्रभू यांनी बिडकीनला बड्या कोरियन वंâपनीचे
उद््घाटन केले. या बड्या उद्योगांना शहर सुरक्षित हवे एवढीच माफक अपेक्षा असते.
रयतेच्या स्वप्नांचा
चुराडा होणार नाही याची सरकारनेही जाणीवपूर्वक काळजी घेतली पाहिजे. परंतु परवा
शहरात धुडगूस सुरू असताना सरकारकडूनही साधा पोलिस आयुक्त मिळाला नाही. पालकमंत्री
आणि गृहराज्यमंत्र्यांनी तेवढी पुंâकर
घातली. भाजप-शिवसेनेतील विसंवाद या शहराच्या मुळावर येत असल्याची भावना वाढीस
लागली आहे. येणारा अधिकारी स्थिरावतो ना स्थिरावतो तोच पळवला जातो. इतके दिवस शहराला
ना पूर्णवेळ पोलिस आयुक्त मिळाला ना महापालिका आयुक्त! दिल्लीत स्वच्छता अभियानात
राष्ट्रीय स्तरावर काम करणारे निपुण विनायक यांच्यासारखे अधिकारी महापालिका आयुक्त
म्हणून दोन दिवसांपूर्वी रूजू झाले. या अधिकाNयावर
औरंगाबादेतील कचNयाचा निचरा करण्याचे
मोठे आव्हान आहे. सगळीकडे ‘स्मार्ट’ भरजरी
वेशभूषेची पॅâशन आली. आमची नेतेमंडळीही पेâटे
बांधून नटली. स्मार्ट होण्यासाठी नाटकीपणे सरसावली. तथापि, स्मार्ट
सिटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष अपूर्व चंद्रा यांनी त्यांचा नक्षाच उतरवला आहे.
राज्याच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात अपूर्व चंद्रा यांनी औरंगाबाद
महानगरपालिकेची मनोवृत्ती स्मार्ट होण्याच्या लायकीची नाही असे स्पष्टपणे नमूद
केले आहे. त्यांनी अनेक वेळा सूचना दिल्या, विनंत्या
केल्या पण ना अधिकाNयांनी प्रतिसाद दिला
ना पदाधिकाNयांनी. या कोडगेपणामुळेच अपूर्व चंद्रा
यांनी आपणाला औरंगाबादच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली. १९८० च्या
दशकात आशियातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर म्हणून लौकिक असलेल्या या शहरात
आजघडीला रस्ते, पाणी, वीज
या मूलभूत सुविधांपासून सगळ्याच गोष्टींचे मोठे त्रांगडे होऊन बसले आहे. राजकीय
पक्षातील विसंवाद आणि गटागटातील तणातणी यांच्या नित्य कटकटीतून शहराचे सौहार्द
बिघडले आहे. शहर तर बेढब होत गेलेच पण सहजीवनातील माणुसकीलाही ओरबाडले जात आहे.
निपुण विनायक ‘डाऊन टू अर्थ’ अधिकारी
आहेत. सध्या शहरात पाणीपुरवठ्याची समांतर योजना लटकलेली, तिकडे
मेट्रोचा बोलबाला तर इथे सिटीबसही नाही, रस्त्याची
चाळणी झालेली, कचNयांचा
ढिग आणि त्यांचा धुराडा तेवढा नव्याने निर्माण झाला आहे. शहर बकाल होत चालले आहे.
ज्यांना या शहराबद्दल आस्था आहे, जाणिवा आहेत अशा
मंडळींनी आता आवाज उठविला पाहिजे.