सावधान! अवकाळी दुष्काळात तेरावा महीना ठरतेय
- संजीव उन्हाळे
उन्हाचा
पारा चढलेला असताना गेल्या पंधरवाड्यापासून अवकाळी वादळवारे अन गारपिटीचा
मराठवाड्याला तडाखा बसत आहे. शिवाय थंडगार आणि उष्ण वाNयांचा संयोग होऊन कडाडणाNया विजांचे बळीही
मराठवाड्यात सर्वाधिक आहेत. अर्थात अवकाळी निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मितच आहे, २०१७ च्या वनसर्वेक्षणात
महाराष्ट्र देशात सर्वात मागे आहे. मराठवाड्यात तर केवळ ६ टक्के वनक्षेत्र आहे. ही
सर्व भयावह स्थिती मराठवाड्याला येत्या दशकात कोरड्या दुष्काळाकडे घेऊन जाणारी
दिसते.
दुपारी
दोनपर्यंत उकाडा, त्यानंतर ढगाळ वातावरण अन सायंकाळी
वादळवारे असा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. मधूनच पावसाची रिपरिप रबी हंगामातील उभ्या
पिकांना तडाखा देत आहे. हे वर्षच तसे विचित्र. हवामानबदलाची तीव्रता मराठवाड्यात
प्रकर्षाने जाणवू लागली आहे. एमजीएममधील एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ वेंâद्राचे संचालक श्रीनिवास
औंधकर यांच्या मते मराठवाडा हे वीज प्रवण क्षेत्र झाला आहे. पृथ्वीच्या अडीच किलोमीटर
कार्यकक्षेत थंडगार वारे आणि उष्ण वारे यामुऴे विजेचा कडकडाट होतो आहे. सध्या
दक्षिण औरंगाबाद, बीड, पाटोदा, आष्टी, मुदखेड, देगलूर, जालना, आणि नांदेडचा बराचसा भाग
वीज प्रवण झाला आहे. विजांमुळे गे्ल्या दोन वर्षांमध्ये १५० जणांचा बळी गेला.
गेल्या दहा वर्षांची आकडेवारी पाहता वीजबळीचा प्रदे्श म्हणून प्रशासनामध्ये हा भाग
ओळखला जाऊ लागला आहे.
सध्या
पावसासाठी तयार होणारे वातावरण, अवकाळी पाऊस, गारपीट याचा संबंध जागतिक
तापमान वाढ व एवंâदरच जगामध्ये होणाNया पावसाची तीव्रता
(इन्टेन्सिटी) यावर आहे. पण याचा एवढाच परस्पर संबंध न जोडता माणसाची निसर्ग
चक्रात अव्याहतपणे चालू असलेली ढवळाढवळ हेच प्रमुख कारण आहे. निसर्गचक्रानुसार
त्याच्या नियमाने साधारणपणे दहा वर्षातून एकदा विंâवा पाच वर्षातून कधीतरी अशी
स्थिती येणे स्वाभाविक आहे. पण अलीकडे अवकाळी पावसाने भंडावून सोडले आहे. २०११-१२
साधी अवकाळी पावसाने कापसाला जीवदान दिले होते. जूनपर्यंत लोक फडतर कापूस घेत
होते. यावेळी किमान एक लाख हेक्टरवर अवकाळीने नुकसान केले आहे.
आपल्याकडे
जंगलातले वाघ-बिबटे मानवी वस्त्यात शिरत आहेत. याउलट भूतान या छोट्या देशाने
पांढरे वाघ वाढविण्याची मोठी किमया करून दाखवली. हा देश अभिमानाने सांगतो की आम्ही
कार्बन न्यूट्रल नाही तर कार्बन निगेटिव्ह आहोत. या देशात वर्षात १.५ दशलक्ष टन
कार्बन उत्सर्जित केला जातो. झाडे लावा – झाडे जगवा अशी केवळ
पोष्टरबाजी करून चालणार नाही. भूतानचा ७२ टक्के भूभाग दाट जंगलाने व्यापलेला आहे. ही जंगले माणसाने तयार केली
आहेत. निसर्गाचे संवर्धन व जतन हे त्यांच्या देशाच्या संविधानामध्ये सर्वात पहिले
धोरण आहे. हा देश बाकी क्षेत्रामध्ये मागे असेलही कदाचित. विकासाची घोषणाबाजी आणि
जीडीपीचे स्तोम या देशात नाही पण नॅशनल हॅपीनेस इन्डेक्समध्ये हा देश प्रथम
क्रमांकावर आहे.
मराठवाड्याची
भौगोलिक स्थिती आणि २०११ ते २०१५ मधील पावसाचे प्रमाण पाहिले तर ३० ते ४२ टक्के
पर्जन्यमान घटले आहे. आपण पश्चिम घाटापासून बरेच दूर आहोत. ढग आडून पश्चिम घाटावरच
खूप पाऊस पडतो. मराठवाडा हा भारताच्या द्विपकल्पाच्या खूप आतमध्ये आहे. ही स्थिती
आणि घटते पर्जन्यमान पाहता दुष्काळ मराठवाड्यासारख्या भूभागावर आहे असे लक्षात
येते. मराठवाड्यात केवळ ६ टक्केच वनक्षेत्र उरले आहे. रस्त्याच्या दुतर्फा आता
झाडं नाहीत. फक्त पुâटपाथ व महामार्गच आहेत. नवीन झाडे लावायची
म्हटलं तरी ती टिकणे व वाढणे याला पाच ते दहा वर्षाचा काळ जावा लागेल. तेवढा संयम
आमच्या राजकीय नेत्यांमध्ये नाही. २०१७ च्या वनसर्वेक्षणामध्ये मराठवाड्यामध्ये
तीन दशकापूर्वी जी जैवविविधता अतिशय संपन्न होती ती आता काहीही राहिली नाही.
केवळ
निसर्गाची अवकृपा म्हणून सगळा ठपका निसर्गावर ठेवता येणार नाही. वातावरणात
कार्बनडायऑक्साईड व इतर हरितगृह गॅसेसचे् प्रमाण एका मर्यादेपेक्षा जास्त झाले.
ओझोनचे प्रमाणही वाढले. लाखो गाड्यांच्या प्रदूषणामुळे यात वाढ होतच आहे. अन्यथा
अवकाळीपासून आपली सुटका नाही. आपत्ती आली की पंचनामे करा, केवळ असा सरकारचा प्रपंच
असू नये. कारण अवकाळीचा मुक्काम दिवसेंदिवस वाढत आहे.