या नभाने या मराठवाड्याला दान द्यावे

पाऊस कधी तरी पडतो, 
झाडाची सुकली पाने
पिके पाण्यावर आली, 
पावसाच्या मंद सरीने

डोळ्यात उतरते पाणी, 
पीक पाहुनी डोळे फिरती 
संसाराचा उडला पारा, 
या कोरड्या जमिनीवरती

थोर कवी ग्रेस असते तर मराठवाड्याच्या चार वर्षांच्या दुष्काळाचे यापेक्षाही यथार्थ वर्णन केले असते. तिकडे उत्तर प्रदेश आणि बिहारसारखी राज्ये महापूराने हैराण असताना मराठवाड्यात पंधरा दिवसांपासून पावसाने दडी दिली आहे. एका पंधरवाड्याची पावसाची ही उघडीप जिवघेणी आहे. संपूर्ण जुलै आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बNयापैकी पाऊस झाला. खरीपाची पिके जोमदारपणे वाढली. या दुष्काळी विभागातील गावागावांमध्ये बळीराजात चैतन्य पुâलले. पिके, पुâले, कळ्या, बोंड्या, पाने आणि शेंगा लागण्याच्या ऐनभरात असताना पावसाच्या ताणाने हातातले पीक विशेषत: कापूस सोयाबीन जाते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. पिकांना किडीने ग्रासले आहे. रोगांनी जेरीस आणले आहे. कापसासाठीच्या विद्यापीठाच्या शिफारशी खाऊन रसशोषक अळ्या मातल्या आहेत. तुडतुडे आणि नावाने कापसाला घेरले आहे. सोयाबीन तर पुâलोरा आणि शेंगा लागायच्या स्थितीत असताना उंटअळी ताठपणे उभी आहे. पाने खाणाNया अळ्या वाढल्या अन् शेतकNयांच्या हातातोंडाशी आलेल्या सोयाबीनची पुरती वाट लागली. अशा प्रतिकुल स्थितीतही पारंपरिक बाजरी हे पीक मात्र थाटात उभे आहे. यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. शेतकNयांनी यावेळी कृषी विभागाचा आंतरपिकाचा सल्ला ऐकला आणि तुरीचे मोठे आंतरपीक घेतले आणि तुरीला पाने खाणाNया अळीने हैराण केले. मग मूग आणि उडीदही शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना मावा किडीचा प्रादुर्भाव झाला आहे.
खरी गोष्ट अशी आहे की पाऊस कधी तरी पडतो याची शेतकNयांनी सवय करून घेतली पाहिजे. दोन पावसातील खंड मोठ्या प्रमाणावर असल्याने ही परिस्थिती हवामान बदलामुळे निर्माण होते. या परिस्थितीशी सामोरे जाण्यासाठी रेशीम उद्योग, अॅ ग्रो फॉरेस्ट्री यासारख्या पर्यायांचा विचार करणे अपरिहार्य आहे. 
या पावसाळ्याने शेतकNयांच्या अवस्थेत काय फरक पडला? अजूनही टँकर चालू आहे. पाटोदा, धारूरसारख्या भागात मोर्चे काढल जात आहेत. डोंगराळ भागातील आयाबायांच्या डोक्यावरील हंडा अजून उतरला नाही. मांजरा धरणात जमलेले टिपूसभर पाणी राखण्यासाठी पोलिसांची रात्रंदिवसाची गस्त वाढविण्यात आली आहे. ७५ मध्यम प्रकल्पांतील जेमतेम २० टक्के, गोदावरी नदीवरील बंधाNयात १९ टक्के पाणीसाठा आहे. उध्र्व गोदावरी भागातील भंडारदरा-निळवंडे, दारणा-मुळा हे वरचे प्रकल्प भरल्यानंतर जायकवाडीला या नभाने दान दिले आणि एकाच फटक्यात ६५ टक्के धरण भरले. त्यात गोदावरी नदीच्या काठावरील काही भाग आणि संत गंगागिरी महाराजांचे पवित्र सरला बेटही पुराच्या तडाख्यात सापडले. या विभागाच्या बाहेर असलेल्या मंडळींचा समज असा झाला की दस्तुरखुद्द जिल्हाधिकाNयांनी गोदावरी पूरग्रस्त भागात दौरा केला. नदीच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या नांदूर-मधमेश्वर एक्सप्रेस कालवा लाभधारक ६० गावांतील पिके मात्र पाण्याने कोमजून गेली. राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी एनएमएसी कालव्याला पाणी सोडण्याची आग्रही मागणी विधानसभेत केली. दस्तुरखुद्द पालकमंत्री रामदास कदम यांनी जिल्हाधिकाNयांना पाणी सोडण्याच्या सुचना केल्या मात्र जिल्हाधिकारी गोदावरी पुराच्या पाण्यावरच अडुन बसल्यात. आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत भाऊसाहेब चिकटगावकर, सतिश चव्हाण, सुभाष झांबड यांनी उपोषनाचे हत्यार उपसले व खडबडुन जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने पाणी सोडले. या सावळ्या गोंधळामध्ये शेतकरी मात्र पाण्यावाचून भरडला गेला. विभागात बीड ४६, परभणी ५१, औरंगाबाद ५४, जालना ५९ टक्के सरासरी पाऊस झाला. या भागातील धरणे अद्यापही कोरडीच आहे. विशेषत: गंगापूर तालुक्यात विभागात सर्वाधिक कमी ३६ टक्के पाऊस झाला आहे. पण एवढे मात्र खरे की कोणताही संघर्ष न करता जायकवाडीला पाण्याचे दान मिळाले. एक पाणीपाळी सोडण्यासाठी उच्च न्यायालयाने निकाल दिला तर नगर-नाशिकची मंडळी पाणी सोडतात. विदर्भाच्या कल्याणासाठी मुख्यमंत्र्यांनी तेलंगणा-महाराष्ट्रात पाणी करार कसा तातडीने केला. तसा एखादा करार विंâवा समेट नाशिक-नगरमधील बलदंड पाणीसम्राट आणि दुष्काळी मराठवाड्यामध्ये घडवून आणावा असे कोणालाही वाटले नाही. उलट केवळ जायकवाडीतच पाणी किती सोडावे यावर वाद घातला जातो. पण त्यामध्ये माजलगाव धरण आणि परळी औष्णिक वेंâद्राचा समावेश अभावानेच केला जातो. परळी औष्णिक वेंäद्राला ६.६ टिएमसी एवढे पाणी लागते आणि त्यातून महाराष्ट्राची विजेची गरज पूर्ण केली जाते. अर्थात, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या कलम-१२(६) प्रमाणे समन्यायी वाटप करण्याचे सोडून मराठवाड्यातील मंडळी पाण्याचा वापरच करीत नाहीत. केवळ ३०५ पाणीपुरवठा योजनांना पाणी देणारा हा प्रकल्प आहे अशी भावना झाली आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पैठणचा ़डाव्या कालव्याची क्षमता २००० घनपूâट प्रति सेवंâद एवढी कमी झाली आहे तर उजवा कालव्यामध्ये वेड्या बाभळीचे वन मातले आहे. शिवाय शेतकरी पाणी मागत नाही म्हणून तक्रार केली जाते. पाण्याची थकबाकी राहिली म्हणून शेतकरी पाणी मागण्यास धजावत नाही. हे दुष्टचक्र किमान यावर्षी तरी थांबले पाहिजे. म्हणजे किमान दुष्काळाची पाश्र्वभूमी लक्षात घेऊन पहिली पाणीपट्टी माफ केली पाहिजे आणि शेतकNयांनीसुद्धा दिलदारपणे पहिला हप्ता अग्रीम पाणीपट्टी म्हणून भरला पाहिजे. पण पाण्याचे नियोजन करण्याची संवेदना मराठवाड्यातील सत्ताधाNयांमध्ये नाही. ६५ टक्के जायकवाडी धरण भरले, तरी तिच्या पोटात किती गाळ साचला आहे याचा अंदाज येत नाही. एवढेच नव्हे तर या धरणाच्या वर बेकायदेशीरपणे किती उपसा सिंचन योजना करण्यात आलेल्या आहेत याचा साधा अदमास अजून घेतला गेला नाही. खरं तर उपग्रहाद्वारे या गोष्टींची माहिती घेणे सहज शक्य आहे. पण सर्वांनाच खूष करण्याचे धोरण असल्यामुळे सरकारकडून काही अपेक्षा नाहीत. मराठवाड्यातील बरीचशी शेती ही कोरडवाहू आणि विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहे. जसे या नभाने जायकवाडीला संपृक्त केले तसेच या नभाने या मराठवाड्याला भरभरून दान द्यावे आणि तेही तत्परतेने एवढीच वरूणराजाला आपण प्रार्थना करू शकतो.