हवे स्त्रियांचे मानसिक सक्षमीकरण

.

 - डॉ.अनघा पाटील

अमेरिकेच्या न्यूयॉर्वâ शहरातील रूटगर्स चौकात १०८ वर्षांपूर्वी कापड़ उद्योगातील असंख्य महिलांनी आपल्यावर होणाNया अन्यायाविरुद्ध अभूतपूर्व निदर्शने केली. कामाचा अत्यल्प मोबदला, जीवघेणे काम, अत्यंत असुरक्षित आणि गैरसोयी असलेले कामाचे ठिकाण याविरुध्द उभारलेल्या ऐतिहासिक लढ्याचे स्मरण म्हणून क्लारा झेटकीन यांनी कोपनहेगमध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव मांडला. आपल्या न्याय्य हक्कांसाठी शोषित, पीडित स्त्रियांनी केलेल्या संघर्षाचे, योगदानाचे स्मरण म्हणजे जागतिक महिलादिन. या संस्मरणीय लढ्यापासून स्पूâर्ती घेऊन महिलांचे प्रश्न, त्यांची सोडवणूक याबाबत सबंध जगभरच विचाराला चालना मिळाली.

देश-विदेशात गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारच्या ज्या विविध चळवळी झाल्या त्याचे फलित म्हणजे सक्षमीकरण संकल्पनेचा उदय. सक्षमीकरण ही गतिमान, बहुआयामी संकल्पना असून त्यात स्त्रियांना शक्ती प्रदान करणे, तिचे आत्मभान, विश्वभान, परिसर भान वाढविणे, स्वत:बद्दलच्या जाणीवा डोळस करण्याबरोबरच त्या अधिक विस्तारणे, निर्णय क्षमता वृद्धिंगत होणे, स्त्री-पुरुष समानतेसाठी कृतिशील होणे या गोष्टी आंतर्भूत आहेत. या संकल्पनेला अनुसरून महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक सामाजिक, आर्थिक, राजकीय कार्यक्रमांबरोबरच घटनात्मक तरतुदीही करण्यात आल्या. विविध प्रकारची कौशल्ये, तांत्रिक ज्ञान महिलांना दिले गेले. परंतु, स्त्रियांची अवहेलना, प्रतारणा, शोषण आणि अन्याय-अत्याचार संपलेले नाहीत.

सक्षमीकरणाच्या या प्रक्रियेमध्ये स्त्रियांच्या मानसिक सक्षमीकरणाबाबत मात्र दुर्लक्ष आणि अनास्था दिसते. मानसिक सक्षमीकरणामध्ये महिलांच्या मनातील भीती, अपुरेपणाची दुय्यमत्त्वाची, असुरक्षिततेची भावना दूर होऊन त्यांचा आत्मविश्वास, स्वआदर, स्वसामथ्र्य, स्वसंकल्प वृद्धिंगत होणे अपेक्षित आहे. त्यांचे मनोबल वाढून स्वत:च्या गुणांची ओळख पटणे आणि त्याचा वापर करता येणे गरजेचे आहे.

आपल्या समाजात स्त्री जन्म म्हणजे बोजा, ताण, संकट, एक प्रकारची ब्याद अशा सामाजिक दृष्टिकोनामुळे दिवसेंदिवस स्त्रियांचे मानसिक प्रश्न गुंतागुंतीचे होत चालले आहे. जन्माला आल्यापासून ज्या पद्धतीने स्त्रियांची कुटुंबामध्ये जडण-घडण होते, त्यातून न्यूनगंड, भितरेपणा, अपराधीपणा, असहाय्यता इत्यादीमुळे स्त्री जीवन काळवंडते. लिंगभेदावर आधारित संगोपनामुळे एक पराभूत, सामथ्र्यहीन व्यक्तित्त्वढाचा बनतो. आपले जीवन दुसNयांकरिता आहे, समर्पणासाठी आहे हा विचार मनामध्ये पक्का रूजतो. त्यामुळे स्वत:चे स्वतंत्र अस्तित्त्व टिकवायला तिला वावच राहत नाही. त्याची जबरदस्त विंâमत तिला मोजावी लागते. माझे स्वत:चे मला काहीच नाही, मुलांच्या तैनातीत, नवNयाच्या सरबराईत त्याचे मन सांभाळण्याच्या कसरतीत, स्वत:च्या आवडी-निवडी, विचार, छंद, गरजा बाजूला ठेवून ती नि:स्वत्व बनते. जीवनाबद्दल निरसता, विफलता, विषण्णता निर्माण होऊन ती कोलमडते. स्त्रियांमधील वाढते नैराश्य चिंताजनक आहे. तसेच स्त्रीमधील अनेक स्थित्यंतरे, शारीरिक बदल यामुळे त्यात भरच पडते. नैराश्य भावना दीर्घकाळ टिवूâन राहणे हे स्त्रियांच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. कुटुंबाची स्वामिनी, कर्तीधर्ती असलेल्या स्त्रीचे मानसिक आरोग्य जपले जावे असा विचारही फारसा होताना दिसत नाही. गरज आहे ती मानसिक सक्षमीकरणाची. अगदी सुरुवातीपासूनच जाणीवपूर्वक कुटुंबातून होणारी सक्षम, विवेकनिष्ठ विचारांची रूजवणूक त्याला अनुसरून केल्या जाणाNया डोळस कृती यामध्येच समर्थ व्यक्तित्व विकासाच्या जडणघडणीची बीजे आहेत.

हॅरियट ब्रेकर या मानसोपचार तज्ज्ञाने १९८६ मध्ये ई-व्यक्तित्व प्रकारच्या स्त्रिया (E-type women) ही संकल्पना मांडली. ई-व्यक्तित्व प्रकारच्या स्त्रिया ताणग्रस्त असून त्या प्रत्येक गोष्ट प्रत्येकासाठीअसा विचार करतात. या स्त्रिया कर्तृत्वसंपन्न असून आपले करिअर आणि कुटुंब अशा दोन्ही आघाड्यांवर यशासाठी धडपडतात. या स्त्रिया वुâटुंबामध्ये गृहिणी, माता, पत्नी अशा विविध भूमिकांबाबत आणि नोकरीच्या ठिकाणी स्वत:ची सक्षमता सिद्ध करू पाहतात. त्यामुळे त्यांची स्थिती दोन्हीकडून जळणाNया मेणबत्तीसारखी असते. घरीदारी स्वत:ला समर्थ, कार्यक्षम, कार्यकुशल सिद्ध करण्याच्या मानसिकतेमुळे त्यांना अनारोग्याची मोठी विंâमत मोजावी लागते. तिच्या प्राविण्यामुळे तिच्याकडून जास्तच अपेक्षा केल्या जातात आणि जबाबदाNया ढकलल्या जातात. मी सगळीकडे कामी आले पाहिजे, या भावनेने ती निरंतर कष्ट उपसत असते आणि शेवटी ताणचक्रात सापडते.

आपण कुठे कमी तर पडत नाही ना? या अपुरेपणाच्या भावनेमुळे तिच्या आत्मगौरवाला धक्का बसतो आणि पुन्हा ती ध़डपडत राहते. ब्रेकर या मानसशास्त्रज्ञाने ई-प्रकारामधल्या स्त्रिया चुकीच्या धारणांमुळे किती तणावग्रस्त बनतात हे सांगितले. उदा. मी सर्व गोष्टी बरोबरच केल्या पाहिजेत. मला दिवसभरात जास्तीत जास्त गोष्ट करता आल्या पाहिजेत. प्रत्येक गोष्ट् ताणविरहीत, न थकता करता आली पाहिजे. इतरांनी मला जे करायला सांगितले आहे ते करून मी त्यांना खुशच केले पाहिजे. प्रत्येकासमोर मी स्वत:ला सिद्ध केले पाहिजे. सर्वकाही करण्यामध्ये मला आनंद झाला पाहिजे. जोपर्यंत मी एखादी गोष्ट पूर्ण करीत नाही तोपर्यंत मी समाधानी होऊ शकत नाही. मला जे करायचे आहे ते केल्याशिवाय मी स्वस्थ राहू शकत नाही. लोकांना माझी गरज वाटायची असेल तर मी त्यांच्यासाठी सर्वकाही केले पाहिजे तरच ते मला विंâमत देतील. मी प्रत्येकासाठी प्रत्येकच गोष्ट केली पाहिजे. या चुकीच्या धारणांमुळे दिवसेंदिवस अर्थार्जन करणाNया महिला तणावग्रस्त बनून मानसिक अनारोग्याच्या बळी ठरत आहेत. त्यांच्या विचारशक्तीवर, कार्यशक्तीवर, एकाग्रतेवरही त्याचे दीर्घकालीन परिणाम होत आहेत.

पण याचे निराकरण करण्यासाठी मला नेमवंâ काय करायचं आहे याचा प्राधान्यक्रम स्त्रियांनी ठरवला पाहिजे. मुख्य म्हणजे मला जिथे नाही म्हणायचे आहे तिथे ठामपणे नाही म्हणण्याचा सराव केला पाहिजे. आनंददायी गोष्टी करण्यासाठी स्वत:ला वेळ राखून ठेवता आला पाहिजे. एकविसाव्या शतकातील नैराश्याचा धोका ओळखून काही गोष्टी करण्याची गरज आहे. ग्रामीण भागामध्ये ज्या प्रमाणे बचत गटांची चळवळ सशक्त झाली, स्थिरावली, रूजली त्याचे अनेक चांगले परिणाम दिसून आले आहेत. त्याच पद्धतीने शहरी भागातही भगिनीभाव वृद्धिंगत होण्यासाठी, परस्परांमधील मोकळा संवाद वाढविण्यासाठी, मनावरचे ताणाचे ओझे दूर होण्यासाठी गरज आहे ती आधारगटांची. त्यात होणारे भावनांचे आदानप्रदान, मिळणारे पाठबळ, आधार, समाधान यामुळे मानसिक सक्षमीकरणाची वाटचाल  अधिक गतिमान होईल.