अंबादासांवर ‘भवानी’ मेहरबान


- संजीव उन्हाळे

शिवसेनेचे अंबादास दानवे औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेचे आमदार झाले. त्यांनी १९१ काँग्रेसधार्जिणी मते फोडून ४१८ मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. विधान परिषदेच्या या मतदारसंघातला हा पहिलाच विक्रम आहे. यामुळे एवंâदर राजकारणात वेगळे सत्तावेंâद्र निर्माण होणार असून शिवसेनेला यामुळे बळ मिळेल. तथापि, या निवडणुकीत घोडेबाजारावरून दोन्ही उमेदवारांनी काढलेले संयुक्त निवेदन ऐतिहासिक तर राहिलेच पण काँग्रेस उमेदवाराच्या मोठया पराभवासही कारणीभूत ठरले.

मतदारांना भुलविण्यासाठी वेगवेग्या क्ऌप्त्यांचा वापर केला जातो. अर्थपूर्ण वाटाघाटी होतात. हे काही लपून राहिलेले नाही, ते उघड गुपित आहे. म्हणूनच विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील निवडणुकीमध्ये लोकशाहीचे व्यापारीकरण थांबविण्याचा युती आणि आघाडीच्या उमेदवारांनी उभयपक्षी विचार करून जो निर्णय घेतला तो खरोखरीच अभिनंदनीय होता. असे निवडणुकीत सहसा घडत नाही. या निवडणुकीत मात्र दोन्ही प्रमुख उमेदवारांनी निवडणूक पारदर्शक व्हावी अशी इच्छा व्यक्त करून निवडणुकीतील घोडेबाजार थांबविण्याचे मतदारांना आवाहन केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात या निर्णयाला वेगळे वलय आले होते. पण बाजार तो बाजारच. घोडेबाजार हा शब्दप्रयोग काहींना झोंबलाही असेल. आता मतदारांना घोडे म्हटल्याबद्दल अनेकांना म्हणे रागही आला. खरे घोडे असते तर त्यांनी मालकांचा आदेश पाळला असता. पण हे सर्वच घोडे मोठे बहाद्दर निघाले. भवानीदास काँग्रेसचे निष्ठावान! निष्ठावाणाला बाजारात विंâमत नाही. अंबादास दानवे कडवे शिवसैनिक. या अस्सल शिवसैनिकाला तिकीट दिल्यामुळे भाजपच्या गोटात नाराजी पसरली. कारण अनेकदा ते भाजपलाही धारेवर धरत असत. त्यामुळे त्यांची उमेदवारी बदलून घेण्याचाही प्रयत्न झाला. पण निर्णय शिवसेनाप्रमुखांनी घेतला असल्यामुळे त्यात बदल होणे शक्य नव्हते. दानवे यांचा पिंडच आंदोलकाचा. भाजपबरोबर शिवसेनेलाही सत्ता मिळाली, हे त्यांच्या गावी नव्हतेच. पीक विमा योजनेच्या विरोधात रान उठवून अनेक ठिकाणी त्यांनी शेतकNयांसाठी कार्यालये काढून सरकारविरोधी वातावरण तापवत नेले. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हे पद अनेक ठिकाणी नावापुरते. पण आपल्या तेरा वर्षांच्या कारभारात त्यांनी या पदाचा करिश्मा इतका वाढविला की अनेकांना त्याची दखल घ्यावी लागायची. खासदार रावसाहेब दानवे आणि लोकसभेचे सभापती हरीभाऊ बागडे यांनी युतीधर्म पाळला पाहिजे असे सुनावले आणि विरोधही शमला. त्यामुळेच भाजपची २११ मते अंबादास दानवे यांच्या पारड्यात पडली.

विक्रमी ५२४ मतांनी या निवडणुकीत विजयी होण्याचा पहिला मान अंबादास दानवे यांनी मिळवला आहे. सर्व पक्षांशी संपर्वâ अंबादास दानवे करीत होते. एक घटना तर अशी घडली की आमदार अब्दुल सत्तार आपल्या पाठिराख्या नगरसेवकांची बैठक सिल्लोडला काँग्रेसभवनात घेत होते. तिथे दानवे थेट पोहचले. आणि सत्तार यांनीही उदारपणे दानवे यांना बोलण्याची अनुमती दिली. या संधीचा फायदा घेऊन दानवे यांनी सत्तार यांच्याबद्दल इतके भावूक उद््गार काढले की सत्तारसाहेब उभे राहिले आणि त्यांनी तिथल्या तिथे पाठींबा जाहीर केला. अशाच पद्धतीने प्रत्येक एमआयएमच्या नगरसेवकाला दानवे यांनी संपर्वâ साधला. शेवटी पक्षनेतृत्वाने निवडीप्रमाणे एमआयएमच्या नगरसेवकांना मतदानाचे स्वातंत्र्य बहाल केले. एमआयएमने सुद्धा शिवसेनेलाच मतदान हे सुद्धा राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे.

याउलट घोडाबाजाराचे संयुक्त निवेदन काढताना काँग्रेसच्या कोणत्याच पदाधिकाNयाला विचारले नाही. आता विचारायचे कशाला? शेवटी लोकशाहीच्या उच्चमूल्यांच्या रक्षणासाठी त्यांनी हे निवेदन काढले. अर्थात, लोकशाहीमूल्य आणि निवडणुका यांच्यातील नाते आता विरोधाभासापुरते उरले आहे याची पंच्याहत्तरीतल्या भवानीदासांना काय कल्पना! सध्या लोकशाही म्हणजे निवडणूक जिंकणे, इतके सोपे समीकरण झाले आहे. नुसता नंबरगेम. पण भवानीदास याला फशी पडले. काँग्रेसचे स्थानिक नेते आता या निवेदनामुळेच भवानीदास जिंकण्याआधीच हरले असे काँग्रेसचे स्थानिक नेते म्हणू लागले. काही नेते तर म्हणे घोड्याची खोड आम्हाला माहीत असल्यामुळे खरेदीदाराचे अधिकार आम्हाला द्याम्हणून हाटून बसले. एवढी केविलवाणी अवस्था होती की  प्रत्यक्षात या पितापुत्रालाच निवडणूक लढवावी लागली. त्याला काही कारणेही घडली. वानगीदाखल सांगायचे तर अर्जुन खोतकर यांच्या जालना येथील निवासस्थानी भवानीदास कुलकर्णी सदिच्छा भेटीसाठी गेले. त्यावेळी अंबादास दानवे तिथे असतील हे बाबूरावांच्या गावीही नव्हते. तासभर कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. खोतकरांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे हकनाक आमदार वैâलास गोरंट्याल यांचा राग उमेदवारांनी ओढवून घेतला. ही सगळी घसरणीला लागलेली परिस्थिती भवानीदासांना शेवटपर्यंत सावरता आली नाही.

काँग्रेसचा हा पराभव पराभूत मानसिकतेतून झाला की निष्ठावंतांना उमेदवारी दिल्यामुळे झाला? मुळामध्ये ही निवडणूक काँग्रेसने गांभिर्याने घेतलीच नाही. म्हणजे तसे कोणतीच निवडणूक ते गांभिर्याने घेत नाहीत. उमेदवारी मिळविण्यासाठी मात्र जिवाची बाजी लावली जाते. अन उमेदवारी मिळाली की औसानघातकीपणा करणारी मंडळी काँग्रेसच्याच वळचणीला असतात. आता अब्दुल सत्तार यांची पूर्ण जिंदगी काँग्रेसमध्ये गेली, त्या जिंदादिल नेत्याचा किमान रूसवा काढण्याचा प्रयत्न तरी झाला का! एमआयएमने शिवसेनेला मदत केली याचे भाजपला म्हणे खूप वाईट वाटले. पण युद्धात आणि प्रेमात सर्व माफ असते या म्हणीप्रमाणे दानवे निवडणूक लढले. शिवसेनेच्या दिमतीला यावेळी अनिल देसाई, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई असा मोठा पाठिंबा दानवे यांना दरदिवशी मिळत होता. संयुक्त निवेदन काढण्याची चतुराई राजू वैद्य यांनी दाखविली. आपल्याला तिकीट नाकारले नाही असा भाव मनात विंâचिंतही न ठेवता एक टिम म्हणून काम केले. काँग्रेसची अशी कोणती टिम होती. शेवटी जिंकणे विंâवा हरणे हे कुलकर्णी कुटुंबियांवर सोडून सर्वजण बघ्याची भूमिका घेत होते. समजा भवानीदासांसारखे वयोवृद्ध नेते नको होते तर किमान पक्षश्रेष्ठीला कोणी सांगितले का? एकेकाळी खेड्यापर्यंत केडर असलेला, सहकार, शिक्षण, बँका अशा माध्यमातून प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलेल्या काँग्रेसच पक्षाची ही शोकांतिका खरोखरच पाहवत नाही. असे ऐकण्यात येते की अंबादास आणि भवानीदास यांनी संयुक्त पत्रकार परिषद घ्यावी असा मूळचा विचार होता. पण जुन्या पिढीतले हे भाबडे नेते शिवसेनेच्या चाणाक्षपणाला बळी पडले. कदाचित, त्यावेळी घोडेबाजारांचा हा विचार त्यांनी केला नसता तर काँग्रेस-राष्ट्रवादी त्यांच्यापासून दुरावले नसते आणि रेसकोर्सवर चुरस निर्माण झाली असती.

याउलट शिवसेनेमध्ये पहा! चंद्रकांत खैरे खासदारकी हरले. पण सेनेचे ते उपनेते आहेत. आता अंबादास दानवे यांच्या रूपाने नवीन पिढी उदयास आली आहे. दानवे अभ्यासू आणि तळागळापर्यंत संपर्वâ असलेले नेते आहेत. मातोश्रीशी त्यांचा चांगला संपर्वâ आहे. शिवसेनेमध्ये या निमित्ताने एक नवीन क्रियाशील सत्तावेंâद्र निर्माण होणार हे मात्र खरे. मूळ प्रश्न असा आहे की काँग्रेस यातून काही धडा शिकणार आहे का?