गेले जेट, कधी येणार स्पाईसजेट


- संजीव उन्हाळे

प्रश्न कोणीच मांडेना तेव्हा औरंगाबाद विमानतळाने आपली स्वत:ची वैâफियत मांडली. नाव इंटरनॅशनल पण प्रत्यक्षात जेटच्या शोकांतिकेनंतर पुरेसे डोमॅस्टिकही राहिलेले नाही. मुंबईची रात्रीची विमाने तरी किमान या आंतरराष्ट्रीय तळावर थांबवा अशी विनवणी केली. मुंबईशी सान्निध्य असल्याने नैसर्गिक न्यायाने ही मागणी उचित होती पण हा तळ गुजरातेत हलविण्यात आला. इंटरनॅशनल कॉर्गो हबसाठी सगळी यंत्रणा असूनही प्रत्यक्षात एकही मालवाहू विमान ना आले ना गेले. ओके बोके तेवढे विमानतळ राहिले. उपर से शेरवानी अन् अंदरसे परेशानी असलेले हे विमानतळ आज रस्तळत आहे.

मी औरंगाबादचे विमानतळ! अजिंठा आणि वेरूळचा जागतिक वारसा कुशीत घेऊन बसलेल्या औरंगाबाद नजिक वसलेले. नुसते म्हणायलाच इंटरनॅशनल एअरपोर्ट. खरं तर नाव सोनूबाई अन् हाती कथलाचा वाळा अशीच माझी अवस्था आहे. तीच वैâफियत मी मांडणार आहे. विकासाचा खुळखुळा वाजविणारे नेते, मंत्री-संत्री कोणीच काही बोलत नाहीत. जेट एअरवेजने पंख मिटले आणि माझ्यावर अवकळाच पसरली आहे. आंतरराष्ट्रीय वगैरे असलेला माझा डोलारा चार वाजता उघडतो. दोन-चार तास जिवंत असल्यासारखे वाटते. विलासराव देशमुखांच्या काळात विस्तार झाला. माझे विस्तारीत रूप २१ नोव्हेंबर २००८ रोजी मोठा गाजावाजा करून जगासमोर मांडले. माझ्याच धावपट्टीवरून हज यात्रेकरूंचे पहिले विमान हजकडे झेपावले.  या गोष्टीला उणीपुरी दहा वर्षेही झाली नाहीत तो पदरी शुकशुकाट येऊ घातला आहे.

माझे नवे रूपडे पाहून मकब-याचा रंग उडाला. पाणचक्कीचे पाणी आटले. वाटायचे आता मला जागतिक दर्जा लाभला आहे. त्यामुळे जगभरातले पर्यटक इकडे घेऊन येईन. अजिंठा-वेरूळसह, देवगिरी किल्ला, पाणचक्की, मकबरा, बौद्ध लेण्या, घृष्णेश्वर गजबजून जातील. झपाट्याने विकसित होत चाललेले ऐतिहासिक औरंगाबाद शहराचेही रूप पालटेल. पण कसले काय? सा-यांचाच वेग मंदावला आहे. माणसापेक्षा या सगळ्या वास्तूचं आयुष्य कितीतरी मोठं असतं. अनेक चढ-उतार त्यांनी पाहिलेले असतात. वास्तूच्या दशा आणि दिशा माणसाच्याच तर हाती असते. या शहरातील ५६ दरवाजे आणि प्रत्येक बुरूज ढासळले. अनेक वास्तू जमीनदोस्त झाल्या. काही रडत रखडत उभ्या आहेत. ‘सोडा अंजिंठा-वेरूळ, मूर्ती तोडा विंâवा फोडा, नटीच्या गाडीभोवती आता लोकांचा गराडा’. असले नटवे पर्यटन वाढत आहे. जागतिक वारशांची लचके तोडली जातात. त्यांच्या अंगाखांद्यावर अतिक्रमणे केली जातात, हे सगळं पाहून मन खंतावते. माणसाच्या पुâकाच्या वल्गना ऐवूâन हसूही येते. या शहरातील इकबाल दरवाजा, आणि खास दरवाजा केव्हा गायब झाले हे कोणालाच कळले नाही. शताब्दीनगरजवळचा खून गेट आणि जिन्सीमधील खास गेट तर महापालिकेनेच पाडले. साक्षात जिल्हाधिकारी कार्यालयामागील परिसरात भलामोठा हाथी हौज होता, तो नष्ट करण्यात आला. अशा ऐतिहासिक वास्तू जतन करण्याऐवजी त्या पाडणे-बुजविणे सगळ्यांना सोपे वाटले. सुभेदारी, जनाना महल, मर्दाना महल, आदी अनेक वास्तू ज्या कारागिरांनी बांधल्या त्यांनी पै पैसा म्हणजेच दमडी दमडी गोळा करून आपल्या घामातून दमडी महल उभारला. तो दमडी महल जेव्हा नेस्तनाबूत झाला तेव्हा ते कारागीरही हळहळले असतील. कारागिरांच्या कलाकुसरीतून उभा राहिलेला हा महल रस्त्यात अडसर ठरतो म्हणून जमीनदोस्त केला गेला. त्याची बोच अजूनही अनेकांना वाटते. बेगमपुरा किल्ल्याचे सर्व दरवाजे तुटले आहेत. उरल्यासुरल्या  तटबंदीला विचारतो कोण? ज्येष्ठ इतिहासकार शेख रमजान तेवढे हळहळ व्यक्त करीत असतात.

अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या साईबाबांच्या शिर्डीला विमानतळ झाले. त्याचा झपाट्याने विकास झाला. आता शिर्डी हैदराबाद, बंगलुरू, उदयपूर, जयपूर, चेन्नई, भोपाळ आदी शहरांशी जोडले गेले. या विमानतळासाठी साईबाबा संस्थानने बराच पैसा खर्च केला. तसा माझ्यासाठीही जपानच्या बँक ऑफ इंटरनॅशनल कोऑपरेशनने ८१७ दशलक्ष कोटी रुपयांची घसघशीत मदत केली. आताशी कोठे अजिंठयाच्या रस्त्याचे पांग फिटते आहे. परवापर्यंत औरंगाबादचे दर्शन म्हणजे नको रे बाप्पा अशीच पर्यटकांची भावना होती.

करावे तसे भरावे या म्हणीप्रमाणे हे शहर इतिहास गाडण्याचा जसा प्रयत्न करीत आहे तशा यातना वाढत आहेत. हे शहर नहर-ए-अंबरीसाठी प्रसिद्ध होते. जुन्या शहरात चोवीस तास पाणी खळखळायचे. आता नहरवरच अतिक्रमणे झाली. गंमत म्हणजे ८ किलोमीटरची नहर इंग्रजांनी अडवली आणि ते पाणी आपल्या लष्करी छावणीकडे वळविले. आमच्या शेंदाडशिपायांना साधी ही भींत तोडून ते पाणी शहराकडे वळविता आले नाही. (पैशाची हेरापेâरी करण्याच्या उद्देशाने समांतर पाणीपुरवठा योजनेचा घोळ गेल्या एक दशकापासून चालू आहे) हे शहर वेळीच सावध झाले नाही तर या सर्व ऐतिहासिक वास्तूंचा शाप असा मिळेल की प्यायला पाणी उरणार नाही.

मला आंतरराष्ट्रीय करून ठेवले पण उपयोग काय? दिवसभरातून एक-दोन विमाने ये-जा करतात. तिकडे मुंबई विमानतळावर एवढी गर्दी झाली आहे की पार्विंâगसाठी टिचभर जागा मिळत नाही. इथून उडालेले विमानही लँडींगसाठी घिरट्या घालत राहते. किमानपक्षी रात्रीची विमानं तरी औरंगाबादला मुक्कामी यावीत. दमट मुंबईपेक्षा औरंगाबादची हवा कितीतरी चांगली. वेंâद्र सरकार याचा विचार करीत नाही. वेंâद्राने मुंबईमधील रात्रीची विमाने थांबविण्याची सोय गुजरातमधील अहमदाबादेत केली. या देशाच्या प्रधानसेवकांनी साधे रात्रीचे विमानसुद्धा मुक्कामाला महाराष्ट्रात ठेवले नाही. काय कमतरता होती माझ्यामध्ये? सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. फक्त कर्मचाNयांना छानशौकी करण्याची व्यवस्था नव्हती बाबा! रात्रीच्या विमानाचे जाऊ द्या पण गेल्या सहा वर्षांपूर्वी इंटरनॅशनल कॉर्गो सव्र्हिस सुरू करण्याचे आश्वासन मिळाले होते. परंतु मिळाल्या त्या वाटाणाच्या अक्षता. आता किमान देखभाल दुरुस्तीसाठी तरी या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विचार व्हावा.

एप्रिल २०१८ मध्ये श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्ष राजपक्षे औरंगाबादेत आले होते. त्यांनी कोलंबो ते बौद्धगया अशी विमानसेवा सुरू करण्याचा आग्रह मुख्यमंत्र्याकडे धरला होता. या शहराला बौद्ध संस्कृतीचा वारसा आहे. विमानमार्गे औरंगाबाद बुद्धगयेला जोडले गेले तर जगातल्या अध्र्याअधिक बौद्धराष्ट्रांशी ते आपोआप जोडले जाईल. सुदैवाने १६ जुलैपासून दिल्ली-कोलंबो ही विमानसेवा सुरू होत आहे. औरंगाबादनजिक चौका येथे लोकोत्तुरा महाविहार आणि भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय भिख्खू प्रशिक्षण वेंâद्र सुरू झाले आहे हा ही एक ऐतिहासिक अमोल ठेवा ठरणार आहे. इंटरनॅशनल साईट म्हणून हज यात्रा तेवढी सुरू झाली. पण यापेक्षा अनेक गोष्टी करता येऊ शकतील.

आधी कोंबडी की आधी अंडे या म्हणीचा प्रत्यय अगदी अलीकडे औरंगाबादच्या शिष्टमंडळाला आला. ज्येष्ठ उद्योजक राम भोगले, सुनीत कोठारी, नितीन गुप्ता, जसवंतसिंग यांचे शिष्टमंडळ स्पाईस जेट आणि इंडिगोच्या वरिष्ठ अधिकाNयांना भेटले. त्यामध्ये अगोदर पोटॅन्शियल दाखवा मग विमान सुरू करू असाच थेट प्रश्न विचारला गेला. व्यावसायिक संधी मोठी आहे पण त्याची माहिती एकत्रित नाही. वैतागलेले प्रवासी मुंबई-पुणे-शिर्डीमधून विमान पकडतात पण त्याची नोंद नसते. आता जेट गेले किमान स्पाईस जेट तरी सुरू होईल अशी आशा आहे.