आधीच दुष्काळाचा वेढा त्यात अल-निनोचा गराडा
- संजीव उन्हाळे
शतकातला मोठा दुष्काळ असूनही निवडणूक
प्रचारात ना राज्यकत्र्यांच्या भाषणाचा मुद्दा होता ना मतदारांचा. शेतकरी आपले
कळीचे मुद्दे घेऊन मतदान करतो की राष्ट्रवादाचा मोठा मुद्दा! मतपेटीतून ही अस्वस्थता
व्यक्त झाली आहे काय? २३ मे रोजी कळेल. ऑस्ट्रेलियन हवामान
खात्याने मराठवाडा हा अल-निनोच्या तडाख्यात सापडला असल्याचे व त्यामुळे आगामी
वर्षात जेमतेम पाऊस राहील असे मत गेल्या पेâब्रुवारीत व्यक्त
केले. तरीही राजकीय हवामानाला महत्त्व आले. दुष्काळ, हवामान बदल हे मुद्दे
दुय्यम ठरले अन् रंजनवादी लोकशाहीचा उत्सव साजरा झाला.
मराठवाड्यात लोकसभेसाठी दोन टप्प्यात मतदान
झाले. आता प्रत्येक उमेदवार खासदारकीच्या वैâफात तर त्यांचे चेले
पैजा लावण्यात रमलेले आहेत. मराठवाड्यातील निकाल यावेळी धक्कादायक राहतील. पण त्यापेक्षाही
सद्यस्थितीत धक्का देणारी गोष्ट अशी की शतकातला मोठा दुष्काळ असूनही त्या
दुष्काळाची झळ मतदान वेंâद्रापर्यंत पोहचली विंâवा नाही याबद्दल शंका
आहे. सत्ताधारी असो की विरोधी कोणीही दुष्काळाचा, पिण्याच्या पाण्याचा
फारसा विचार केला नाही. निवडणुकीचा मुद्दा तर कोणीच बनविला नाही. त्यात मराठवाडा
ही संतांची भूमी. संथपणे प्रतिक्रिया देणारी. २०१२ पासून पाच हजारांच्या वर
आत्महत्या घडल्या. लातूर, उस्मानाबादमध्ये सहाशे ते सातशे पूâट खोल म्हणजे
पाताळापर्यंत भूगर्भाचे पाणी गेले. मराठवाड्यातील ४० लाख लोकांना टँकरद्वारे पाणी
देण्यात येते. अडीच ते तीन हजार टँकर मराठवाड्यात तैनात आहेत. पाच वर्षे आमच्या
पुढाNयांनी आळीमिळी
गुपचिळी केली. हा विषय ना कधी विधानसभेतल्या चर्चेचा केला ना आंदोलनाचा.
मराठवाड्याला नेतृत्व नाही. पाणी नाही.
अनुशेषाची रक्कम मिळत नाही. चार वर्षांच्या दुष्काळात फक्त घोषणा झाल्या. सगळाच
नन्नाचा पाढा. त्यामध्ये अलनिनोने घातला मराठवाड्याभोवती गराडा घातलेला.
औरंगाबादेतील महात्मा गांधी मिशनचे अब्दुल कलाम एअरोस्पेस वेंâद्राचे संचालक
श्रीनिवास औंधकर यांच्या मते यावेळी तापमान वाढ मोठ्या प्रमाणावर झालेली आहे.
सामान्य स्थितीत प्रशांत महासागराचे तापमान ०.५ असते ते यावेळी ०.८ झाले आहे. हा
अल निनो पॅâक्टर प्रभावी
झाल्यामुळे आगामी खरीपामध्ये मराठवाड्यात जेमतेम पाऊस पडेल. विशेषत: मराठवाड्यात
पावसासाठी पोषक वातावरण राहणार नाही. ढगाळ वातावरण राहील परंतु पाऊस कमी पडेल.
म्हणजे आधीच दुष्काळ त्यात पाऊसमानाची शक्यता कमी यामुळे ही चिंताजनक परिस्थिती
आहे. शास्त्रज्ञांच्या मते मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकाचे काही जिल्हे हवामान
बदलाच्या तडाख्यात सापडलेले आहेत. येणारे कृषी संकट मोठे आहे. २०१० पासून दुष्काळ, नापिकी, गारपीट, वीज पडून मृत्यू अशा
अनेक घटनांची प्रचिती येत आहे. त्यामुळे तर अल-निनो ऐवजी अलखनिरंजन यासारख्या
धार्मिक घोषणांना महत्त्व आले. पिण्याच्या पाण्याऐवजी मोदींचा राष्ट्रवाद मोठा
वाटला. निवडणुकीच्या तोंडावर श्रीराम मंदीर मुदद गाजले. पण शतकातला मोठा दुष्काळ
असूनही तो ऐरणीवर आला नाही. तामिळनाडूमध्ये दुष्काळ पडल्यानंतर तेथील शेतकNयांनी दिल्लीत जाऊन
आंदोलन केले. आत्महत्या केलेल्या शेतकNयांच्या कवट्या दाखवत सरकारचे वाभाडे काढले.
नाशिकच्या आदिवासी भागातील शेतकरी मात्र अनवाणी आंदोलनासाठी मुंबईला गेला.
लासलगावच्या शेतकNयांनी कांद्यासाठी
आंदोलन केले. पण मराठवाड्यातला शेतकरी ढिम्म राहिला.
इव्हेंटप्रिय सरकारने निवडणुका म्हणजे
लोकशाहीचा उत्सव असल्याचे जाहीर करून टाकले. आता तर पाच वर्षांमध्ये येणारी
निवडणूक ही मोठी करमणूक असते. नेते येतात, भाषणे झोडतात, जेवणावळी ऊठतात, पुâकट गाड्यामध्ये जाऊन
सभा ऐकता येते. यापेक्षा या जीवाला अजून पाहिजे तरी काय? शेतकNयांचे प्रश्न नेहमीचे
पण मंदीर-मस्जीद,
राखीव जागा, एक मराठा-लाख मराठा असे काही ऐकले की पेटून
उठायला होते. आपलेच रडगाणे कशाला गायचे. सरकारनेच निवडणुकीला लोकशाहीचा उत्सव
म्हटल्यामुळे निवडणूक रंजनवादी झाली. समाजजीवन शहरी असो की ग्रामीण, आता सगळ्यांचे जगणे
सेल्फी झाले आहे. म्हणजे आपणच आपला फोटो काढायचा, स्वत:लाच शाबासकी
द्यायची असे सगळे चालले आहे.
या सगळ्या राजकीय वावटळीत हवामान खात्याची
हवाही बदलली आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार हवामानाचे अंदाज कसे द्यावेत
यामध्ये हवामान खाते मोठे पारंगत झाले आहे. परदेशामध्ये असे नसते. आपल्याकडे काही
पीक विमा वंâपन्या मालामाल
करण्यासाठी हवामान खात्याचे अंदाज बदलतात. निवडणुकीच्या काळात उगीच कटकट कशाला असे
मानून भारतीय हवामान खात्याने यावर्षी पाऊस सर्वसामान्यपणे चांगला राहील असे
सांगून टाकले. निकालानंतर राजकीय हवा बदलली तर काही भागामध्ये परिस्थिती विपरीत
आहे, असे सांगायला
मागे-पुढे पाहणार नाही. ऑस्ट्रेलियन हवामान शास्त्रज्ञांनी भारताबद्दल व्यक्त
केलेला अल निनोचा दावा खोटा आहे, असे दमदारपणे सांगण्याची हिंमत आपल्या
हवामान खात्यामध्ये नाही. यंत्रणासुद्धा तितकीच दुबळी आहे. नांदेड येथे मल्टीपर्पज
शाळेनजिक हवामानाचा अंदाज व्यक्त करणारी भारतीय हवामानशास्त्र विभागाची प्रयोगशाळा
होती. गुरूतागद्दीचे रस्तारुंदीकरणाचे काम आले आणि ही प्रयोगशाळा सिमेंटच्या
जंगलामध्ये हलविण्यात आली. आता हे हवामान वेंâद्र काय हवामानाचा
अंदाज व्यक्त करणार?
जागतिक हवामान संस्थेच्या निकषात आपले एकही हवामान वेंâद्र बसत नाही. हवामान
वेंâद्र मोकळ्या जागेत
असावे, आसपास इमारती
नसाव्यात,
घनदाट झाडी असावी, म्हणजे मोकळी हवा
निर्माण होऊन अचूक अंदाज वर्तविता येतील. चिकलठाणा हवामान वेंâद्राची शोकांतिका तर
आणखीच वेगळी आहे. हे वेंâद्र केवळ विमानतळाच्या धावपट्टीच्या
तापमानाचा अंदाज घेते. हवामान वेंâद्रे दुर्लक्षित, अडचणीच्या ठिकाणी अन्
अर्धशिक्षित लोकांच्या हातात असतील तर आपल्या हवामानाचे काय अंदाज येतील, याचा अंदाज
बांधण्याची गरज नाही. वेंâद्र सरकारने अमेरिकेकडून ६० लाख टन कडधान्य
आयात केले. ऑस्ट्रेलियाकडून १२ लाख टन हरभरा, वॅâनडातून २० लाख टन
वाटाणे त्याचबरोबर ७ लाख टन मसूरडाळ आयात केली. हवामान खात्यातील अधिकाNयांना हाताशी धरून
व्यापाNयांच्या एका बड्या लॉबीने
हे सारे घडवून आणल्याची उघड चर्चा आहे.
मराठवाड्यातील जनता हवामान बदलाचे भोग तर
भोगत आहेच,
पण किमानपक्षी हवामान खात्याचा कारभार नीट चालावा म्हणून
तरी प्रयत्न केले गेले पाहिजेत. अलनिनोचा हा गराडा तितकासा सोपा नाही. नापिकीने
शेतकरी अगोदरच जर्जर झालेला आहे. त्यात जिल्हा बँका दिवाळखोरीत निघाल्याने
कर्जवाटपाचा पत्ता नाही. शेतमालाला भाव नाही. याप्रश्नी सरकारने गंभीरपणे विचार
केला नाही तर लोक शेतीकडे वळणार नाहीत. स्वयंरोजगाराच्या दृष्टीने ही मोठी भयानक
अवस्था आहे.