बळीराजास निसर्ग, बाजारपेठेने मारले

     गेल्या दोन वर्षापासून  शेती मालाला भाव नाही. टोमाटो ,मिरची ,कांदा कवडीमोल भाव मिळत असल्याने रत्यावर फेकून द्यावे  लागत आहे ,तर राज्यात दुसरीकडे परतीच्या पावसाने पुन्हा एकदा कोप केला. दुष्काळग्रस्त मराठवाड्यात तर आभाळच फाटले. सोयाबीन ,मका ,बाजरी ,कापूस या खरीप पिकास सर्वाधिक जास्त फटका बसला असून, विभागातील लाखो हेकटर वरील पिक बळीराजाच्या हातातून गेले आहे. योगायोगाने राज्यमंत्री मंडळाची बैठक मंगळवारी औरंगाबादेत होत असून, आत तरी मायबाप सरकाने शेतकरयांना तत्काळ भरीव मदत करावीत.   

     हवामान बदल व अल- निनो च्या प्रभावामुळे सलग तीन वर्षापासून  अर्धे राज्य दुष्काळात स्थितीत होते.  एकोणवीस जिल्ह्यातील एकोणवीस हजार पेक्षा जास्त खेडेगावे दुष्काळाला सामोरे गेली.पाणी टंचाई व वाढती नापिकी पाचवीला पुजेलेली असल्याने तब्बल वर्षभरात दीड हजार पेक्षा जास्त शेतकरयांच्या आत्महत्या झाल्यात.या वर्षी ही समाधानकारक पाऊस  होईल असे ,भाकीत भारतीय हवामान विभागासहित स्कायमेट खासगी संस्थांनीही व्यक्त केले होते.  शेतकऱ्यांनीही  मोठ्या प्रमाणत खरीप पिक घेतले.परंतु अल निनोचा चा फटका मनातून जात नाही,तोच पुन्हा एकदा हवामान दाबाचा फटका मराठवाड्यासह संपूर्ण कोकण ,मध्य,उतर  महाराष्ट्रसह बसला.  सलग तीन दिवस परतीच्या (वळवाच्या) पावसाने जोरदार थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या हाती तोंडाशी आलेला खरीप पिकचा घास पुन्हा एकदा हिरवून घेतला.

  अतिवृष्टीचा  सर्वाधिक फाटक बसला तो मराठवाड्याला, लातूर ,बीड, उस्मनाबाद,नादेड ,हिंगोली व परभणी जिल्ह्याला जास्त बसला आहे. राज्यात मराठवाड्यातील सप्टेंबर च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सर्व धरणे कोरडी होती जायकवाडी , विष्णुपुरी वगळता अनेक धरणात टिपूस भर पाणी ही नव्हते तब्बल पाच वर्षापासून कोरडेठाक असलेले बिंदुसरा ,मांजरा ,माजलगाव, सिद्धेश्वर  परंतु परतीच्या पावसाने मात्र माजलगाव ,मांजरा , निम्न तेरणा ,सीना कोळेगाव या धरणात एकाच दिवशी तुडुंब भरली. नादेड मधील  विष्णुपुरी धरणाचे आठ, निम्न दुधना-अठरा, माजलगाव धरणाचे अकरा दरवाजे उघडल्याने पूर स्थिती निर्माण झाली.याशिवाय जिल्ह्यातील लहान मोठे तलाव ही भरलेत धरणातील पाण्याचा  विसर्ग सुरु झाल्याने नदी काठच्या अनेक गावात पूरस्थिती निर्माण झली होती. काही ठिकाणी एन. डी.  आर. एफ. ला पाचारण करावे लागले.पुरामुळे मराठवाड्यात विविध ठिकाणी मनुष्य हानी बरोबर अनेक जनावरे ही पुराच्या वाहून गेलीत.

    मराठवाड्यात  ४६ लाख खरीपाचे क्षेत्र असून ,सोयाबीन ,मका ,उडीद ,बाजरी ,भाजीपाला याचे सर्वाधिक  नुकसान झाले आहे.अतिवृष्टीमुळे विभागातील अंदाजे सहा लाख हेक्टर वरील पिके भुईसपाट  झाली आहे.  काही ठिकाणी शेतकरयांनी कांद्याचे भाव  वाढतील या आशेपोटी कांदा चाळीत  साठवून ठेवलेला कांदा  पावसाच्या पाण्यात  वाहून गेला. तर दमट हवामांनामुळे खराब झाला आहे.परतीच्या पावसाच्या तडाख्यामुळे शेतकरयाचे लाखो रुपये नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यात सलग दोन वर्षापसून शेती मालाल भाव नाही .यावर्षी जपान आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर, युरोप मधील  अर्थिक  स्थिती चांगली राहण्यासाठी झगडतो आहे. चीन आर्थिक स्थितीत चांगली नाही. संपूर्ण जग मंदीच्या फेरयात असताना शेतीमालाच्या भावावर परिणाम झाल्याचे सांगितले जाते. शेती मालाच्या किमतीवर परिणाम झाला आहे. अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेती उत्पदनाचे भाव गडगडल्याने दोन वर्षापासून शेतीमालास  कवडीमोल भाव मिळत आहे.सध्या कांदे ,टोमाटो ,मिरची फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.

  सलग  तीन वर्षापसून हवामान बदलामुळे देश्याच्या अनेक भागात दुष्काळ आहे.यावर्षी चांगला पाऊस होईल, असे भारतीय हवामान खाते यांच्याकडून सांगण्यात आले होते. पाऊसही बारा झाला. मोठया प्रमणात खरीप पिक घेण्यात आली.परंतु  नगदी पिकांना भाव नसल्याने शेतकऱ्यांची वाताहत होत आहे.    

२००८ मध्ये अमेरिकेची सर्वोच्य बँक असलेलेया अमेरिकन फेडरल रिझर्व ने तेथील व्याजदरात कपात केली. श्रीमंत बड्या राष्ट्रांनी विकसनशील देशतील अर्थव्यवस्थेत पैसा गुंतविला परिणामी देस्थातील अंतर्गत अर्थव्यवस्थेत कमालीचा सुधार झाला.  आता या घडीला फेड ने व्याजदरात दीड ते दोन टक्के व्याज दरात वाढ केलाय्ने त्या देशातील गुंतवणूक दारांनी पैसा आपापल्या देशाकडे वळविला आहे.देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे परकीय गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असून मेक इन इंडिया अंतर्गत गुंतवणूक होत आहे.वितीय तुट ही जीडीपी च्या  ४.९ टक्के  आहे तर महागाई दर ही पाच टक्के  इतका आहे .परतू या महागाईचा खरा फयदा  शेतकर्यांना होतना दिसत नाही. आजही शेतीमालाचे भाव गेल्या दोन वर्षापसूनपडलेले आहे. कापसाच्या बाबतीत अमेरिकेत कापसावर भरमसाठ सबसिडी दिल्याने तेथील शेतकरी वाचले, पण याउलट चित्र आपल्या देशात दिसत आहे.सध्या कांद्या प्रश्नी राज्य व केंद्र सरकार यांच्यात समन्वय दिसून आला नाही .अनुदान देण्याच्या संदर्भात राज्य ने वेळेवर प्रस्ताव पाठविला नसल्याचे कृषिमंत्र राधामोहानसिंग यांनी काही दिवसापूर्वी दिल्लीत झालेल्या बैठकीत सांगितले,अद्यापही  कोणतीही ठोस भूमिका अद्याप घेण्यात आलेलेली  नाही.       

शेतकरयानी दुष्काळ च्या अनेक झळा सहन केल्यात, या वर्षी बरा पाऊस असेल भाकीत हवामान खात्याने व्यक्त केले होते.  नगदी पिके कापूस, कांदा, ते मिरची ,अद्रक ,लसून पर्यंत सर्व शेत मालाचे भाव घसरले आहे. मागील वर्षी साडे आठ हजार रुपये  असलेल्या  मुगाला यावर्षी जेमतेम चार हजार रुपये भाव मिळत आहे. तीच कथा मिरचीची  तोडणीचा खर्च  आठ रुपये, तर विक्रीचा भाव  चार रुपये,टोमाटो  चे  संपूर्ण क्यारेत केवळ पंधरा ते तीस  रुपयाला मिळत आहे.  सध्या त्यातून शेतमालाचा वाहतुकीचा खर्च ही निघेना म्हणजे शेतकऱ्याला निसर्गा बरोबर  बाजारपेठेने ही मात्र मारले. असेच चित्र संपूर्ण विभागाचे  आहे. शेतकरी शेतीमाला मिळणाऱ्या भावाच्या विवंचनेत असताना त्यात कहर झाला तो परतीच्य पावसाचा. शुक्रवार शनिवार ,व रविवारी विभागात जोरदार पाऊस झाल्याने पुन्हा एकदा खरीप पिक हातातून गेल्याने जगायचे कसे असाच प्रश्न पडतो.