बिघडली विद्यापीठाची घडी अन् नेटकी बायोडाटाची चोपडी
कुलगुरू
डॉ. बी.ए. चोपडे यांचा बायोडाटा चमकदार आहे एवढेच! शिक्षण क्षेत्रातील त्यांची
कर्तबगारी मात्र चमकदार दिसली नाही. अजूनही विद्यापीठाची घडी विस्कटलेली आहे.
कुलगुरू स्थिर पण बाकी सर्व अस्थिर असा डळमळीत कारभार चालला आहे. कर्मचाNयांची
भरती नाही, विद्यापीठ फंडावरचा बोजा वाढलेला, शिवाय
शैक्षणिक वातावरणाची वाताहत झालेली. विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचे व्यस्त
प्रमाण. २०१८ च्या नॅक पडताळणीला विद्यापीठ कसे सामोरे जाणार हा खरा प्रश्न आहे.
अलौकिक
थोरवी असलेले सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ बाळू आनंदा चोपडे तथा डॉ. बी.ए. चोपडे,
सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून
सुखनैव कारभार हाकत आहेत. १४ जून २०१४ रोजी ते रूजू झाले. एका शास्त्रज्ञाचे
नेतृत्व लाभणार या भावनेने मराठवाडा आनंदला. स्वागत समारंभातली त्यांची भाषा आणि
डौल पाहून हे कुलगुरू आपल्या शास्त्रीय बुद्धीतेजाने किमान हजार-दोन हजार कोटी
रुपये खेचून आणतील असे वाटत होते.
कुलगुरू
मराठवाड्याच्या भूमीत कधी रमलेच नाही. पुण्यनगरीचे त्यांचे प्रेम अतुट आहे. हे
विद्यापीठ उद्याच्या मोठ्या शैक्षणिक स्थानाच्या उड्डाणासाठी हेलीपॅड म्हणून
उपयोगी पडेल, असा त्यांचा समज आहे. त्यामुळेच विद्यापीठाची
विस्कटलेली घडी सावरण्यापेक्षा आपल्या बायोडाटाच्या चोपडीकडे त्यांचे अधिक लक्ष
आहे. त्यांच्या अकरा आंतरराष्ट्रीय शोधनिबंधांसाठी विद्यापीठाने तब्बल ७ लाख १८ हजार
रुपये खर्च केले. शेवटी विद्यापीठ घरचेच! कुलगुरूंसारख्या महनीय व्यक्तीचे
आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रसिद्ध होतात याचे आम्हा तेवढे भूषण. डॉ. चोपडे यांचा
लौकिक एवढा की आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी त्यांना निमंत्रण येते विंâवा
ते तशी सोय करतात. अगदी अलीकडच्या स्पेनच्या भेटीसकट त्यांनी बारा विदेशवाNया
करून विद्यापीठाचे ८ लाख रुपये खर्च केले. इतकी निमंत्रणे येऊ लागली की कुलपतींनी
या परदेशवाNयांना अटकाव घातला. कुलगुरूंचे व्हिजनच तसे
मोठे. आपले विद्यापीठ वेंâद्रीय विद्यापीठ व्हावे असा त्यांनी
ध्यास घेतला आणि तशा अभ्यासासाठी सव्वानऊ लाख रुपये खर्च झाले. कुलगुरूंची किर्ती
सर्वत्र पोहचली. बायोडाटाच्या आधारे आकाशाला गवसणी घालण्याची अदम्य इच्छाशक्ती
असल्यामुळेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदाच्या मुलाखतीपर्यंत ते पोहोचले.
मध्येच आमचे नशीब आडवे आले. ते युजीसीत गेले असते तर पेटारे भरभरून अनुदान आम्हाला
मिळाले असते.
‘‘कुलगुरू
स्थिर अन् बाकी सारे अस्थिर’’ डॉ. चोपडे यांची कार्यशैली असल्याने
हंगामीपदाचे पीक काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. हंगामी कुलसचिव विद्यापीठाचा
प्रत्यक्ष कारभार हाकतात. चोपडेंच्या अवघ्या ३६ महिन्यांच्या काळात तब्बल सोळा
वेळा कुलसचिव बदलले गेले. परीक्षा संचालकच आठ वेळा बदलले गेले. लेखा आणि वित्त
विभागाच्या तब्बल सात अधिकाNयांना बदलण्यात आले. महाविद्यालय आणि
विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक चार वेळा बदलले गेले. आता तर चक्क प्रभारी
कुलगुरूच मिळाला आहे. बाकी बरीच पदे अजूनही प्रभारी आहेत.
विद्यापीठाचे
उस्मानाबादचे उपकेंद्र दुर्लक्षित आहे. तेथील अनेक पदे रिक्त. तरीही उस्मानाबाद कंम्पसचे संचालक तब्बल सहा वेळा
बदलले गेले. विद्यापीठ जगो विंâवा मरो, आपले
पुढचे शैक्षणिक स्थान पक्के झालेच पाहिजे एवढाच त्यांचा बाणा आहे.
ऑगस्ट
२०१५ मध्ये जुन्या व्यवस्थापन समिती सदस्यांचा कार्यकाळ संपला तेव्हापासून अगदी
अलीकडे नवीन व्यवस्थापन परिषद स्थापन होईपर्यंत तब्बल तीन वर्षे डॉ. चोपडे यांचा
एकहुकुमी कारभार चालत. या कालखंडातच नवीन नोकरी भरती करण्याची संधी होती. सध्या
विद्यापीठात पाचशे वंâत्राटी असून दोनशे पदांना शासनाने मान्यता
दिलेली आहे. शिक्षक संवर्गातून ५० पदे हंगामी स्वरूपाची असून त्यापैकी ३६ पदांना
केव्हाच मान्यता मिळाली आहे. या सगळ्याचा भार विद्यापीठाच्या स्वत:च्या फंडावर बसतो.
विद्यापीठाची गंगाजळी विध्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कातून जमा होते.
वनस्पतीशास्त्र विषयात चौदा जागा असताना केवळ दोन जागा भरल्या गेल्या आहेत.
नाट्यशास्त्र विभागात सात जागा असताना तीन प्राध्यापकच आपले नाट्यरंग दाखवू शकतात.
संवाद आणि पत्रकारिता विभागात तर एकुलते एक प्राध्यापक आहेत. असे किती वर्णन
करावे. यातून कालापव्यय तेवढा होत आहे. वर्षभराने डॉ. चोपडे जातील पण पाच
वर्षांच्या गेलेल्या काळाला कोण माफ करणार?